Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.

Mail: allstudy.paper@gmail.com

Contact: +91-9650866419

INTERNATIONAL JOURNAL OF
ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION

Impact factor (QJIF): 8.4  E-ISSN: 2583-6528


Multidisciplinary
Refereed Journal
Peer Reviewed Journal

INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION


VOL.: 3 ISSUE.: 1(January 2024)

औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या अभ्याससवयी आणि शैक्षणिक संपादणूक यांचा अभ्यास


Author(s): सारिका हिरालाल माळी आणि डॉ. शेख तहेमिना नाज


Abstract:

कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी त्याची सवय जडणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासाची सवय लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अभ्यासाची सवय जर चांगली असेल तर शैक्षणिक संपादणूक चांगली दिसून येते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व कळणे गरजेचे आहे. या अभ्यासात औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील विदयार्थ्यांच्या अभ्याससवयी आणि शैक्षणिक संपादणूक यांचा अभ्यास केला जाणार असून औरंगाबाद शहरातील मराठी माध्यमातील इयत्ता ९ वीचे ६० विद्यार्थी नमुना म्हणून निवडण्यात आले आहेत. माहीती संकलित करण्यासाठी सी. पी. माथूर यांची टेस्ट ऑफ स्टडी हैबिट्स अॅण्ड अॅटीट्यूड ही प्रामाणित चाचणी वापरण्यात आली आहे. माहीतीचे विश्लेषण व अर्थनिर्वचनासाठी mean, SD, t- test या सांख्यिकीय तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. निष्कर्षामध्ये असे दिसून आले की, औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या अभ्याससवयी खराब आहेत. औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक संपादणूक कमी आहे. औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील मुले आणि मुलींच्या अभ्याससवयीत कोणताच फरक दिसून आला नाही. तसेच औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील मुले आणि मुलींच्या शैक्षणिक संपादणूकीत फरक आढळून आला नाही.

keywords:

Pages: 79-82     |    2 View     |    2 Download

How to Cite this Article:

सारिका हिरालाल माळी आणि डॉ. शेख तहेमिना नाज. औरंगाबाद शहरातील इयत्ता ९ वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या अभ्याससवयी आणि शैक्षणिक संपादणूक यांचा अभ्यास. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2024; 3(1):79-82,