Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.

Mail: allstudy.paper@gmail.com

Contact: +91-9650866419

INTERNATIONAL JOURNAL OF
ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION

Impact factor (QJIF): 8.4  E-ISSN: 2583-6528


Multidisciplinary
Refereed Journal
Peer Reviewed Journal

INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION


VOL.: 4 ISSUE.: 7(July 2025)

नकाशे संकल्पनांचे अध्ययन अनुभव शिक्षणाचे-एक नवोपक्रम


Author(s): श्रीम.वृषाली मच्छिंद्रनाथ देसाई


Abstract:

सध्याच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांच्या गहन अर्थपूर्ण शिक्षणासाठी आणि त्यांच्या संकल्पनात्मक समज वृद्धिंगत करण्यासाठी पारंपरिक पद्धतींपलीकडे जाऊन नविन शिकविण्याच्या तंत्रांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. याच अनुषंगाने चारकोप सेक्टर २ MPS माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांकरिता YCMOU-Chembur Comprehensive College of Education यांच्या मार्गदर्शनाखाली CONCEPT MAPPING तंत्राचा वापर करून कार्यशाळा राबविण्यात आली. या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना गाभ्यापासून समजून घेण्यासाठी आणि त्या दृश्य स्वरूपात मांडण्यासाठी प्रशिक्षण देणे. कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि नविन शिक्षणपद्धतींची तुलना, संकल्पनांचे मॅपिंग, रचनेचे विश्लेषण, LINKING WORDS चा वापर, आणि RUBRIC च्या साहाय्याने आत्ममूल्यांकन अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला. तसेच १५ दिवसांत विषयवार संकल्पनांचे CONCEPT MAPS तयार करून त्यांचा शिक्षणातील प्रभाव अभ्यासण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि उपक्रमशीलता यामध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. संकल्पनांचे मॅपिंग करताना त्यांनी स्वतःच्या पद्धतीने ज्ञानरचना करत आनंददायी शिक्षणाचा अनुभव घेतला. अशा तंत्रांचा वापर शिक्षक व शिक्षणसंस्था यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. संकल्पनांच्या स्पष्ट समजुतीसाठी आणि अध्ययन प्रक्रियेत गती आणण्यासाठी CONCEPT MAPPING हे एक प्रभावी तंत्र आहे हे या संशोधनातून स्पष्ट झाले.

keywords:

Pages: 89-91     |    2 View     |    0 Download

How to Cite this Article:

श्रीम.वृषाली मच्छिंद्रनाथ देसाई. नकाशे संकल्पनांचे अध्ययन अनुभव शिक्षणाचे-एक नवोपक्रम. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2025; 4(7):89-91,