Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.
Mail: allstudy.paper@gmail.com
Contact: +91-9650866419
Impact factor (QJIF): 8.4 E-ISSN: 2583-6528
INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION
VOL.: 4 ISSUE.: 7(July 2025)
Author(s): डॉ. गोरोबा तुकाराम खुरपे
Abstract:
चार्वाक दर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यता दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्याने चार्वाक दर्शनात माणसाच्या भौतिक जीवनात प्राधान्य दिले ज्यामुळे सद्यः स्थितीत मानवी विकासाची अनेक दालने समृद्ध होण्यास मदत होण्यासाठी आणि भौतिक जीवनाचा खरा आनंद घेण्याची सक्षम क्षमता असलेल्या मानवाला त्याच्या क्षमताची जाणीव करून देण्याचे कार्य चार्वाकतत्त्वविचारांनी केलेले आहे. चार्वाक तत्त्वविचाराने मानवतावादी व्यवस्थेचे समर्थनच केले नाही तर तशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या विचारधारेने केला आहे. चार्वाकांची भविष्यकाळ मृत्यूच्या पलीकडे ताणावा अशी त्यांची इच्छा नव्हती तर वर्तमान काळातील कृतींच्या भविष्यकालीन परिणामाची त्यांना जाणीव होती म्हणून चार्वाकांनी भावी सुखासाठी विवेक पूर्ण कृती करावी असे म्हटले आहे. चार्वाक दर्शनात सुखवादी संकल्पनेचा दृष्टीकोन असा आहे की, सुखप्राप्तीसाठी परिश्रमाला पर्याय नाही कारण माणसाला सुख हवेच असते. सुखासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. सुख किंवा आनंद म्हणजे लैंगिक स्वैराचार नाही त्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. सुख म्हणजे केवळ ‘खा, प्या, मजा करा’ इतकेच नसून ते भौतिक तत्त्वज्ञानच आहे. चार्वाक दर्शनात मानवाने केवळ भय, निद्रा आहार, मैथुन यातच गुरफटून न जाता त्याच्याही पुढे गेले पाहिजे कारण मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे त्यामुळे तो शारीरिक सुखाची अपेक्षा करतो आणि ही बाब नैसर्गिक आहे. ‘खा, पी चैन कर’ ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे याला फाटा देऊन चालणार नाही मात्र ही सहज प्रवृत्ती नैतिकतेच्या कसोटीवर खरी उतरली पाहिजे. चार्वाकांनी यज्ञ संस्कृतीचा विरोध करताना सतत कार्य करणे म्हणजेच यज्ञ याचा पुरस्कार केला आहे अर्थात दैववाद मानवाला पुरुषार्थहीन बनवितो तर प्रयत्नवादात परिश्रामाला पर्याय नसून प्रयत्न करणारा हा कर्मवादी असतो. प्रा. डॉ. आ.ह. साळुंके यांनी संबोधले आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चार्वाकांनी जीवनाविषयी आस्था निर्माण केली आणि मोक्षास पुरुषार्थ न मानता अर्थ आणि काम तत्त्वास पुरुषार्थ स्वरूपात स्वीकारला. ही नाविन्यता आजच्या समाजास खूपच पोषक आहे.
keywords:
Pages: 12-16 | 2 View | 0 Download
How to Cite this Article:
डॉ. गोरोबा तुकाराम खुरपे. चार्वाक दर्शनातील नाविन्यता आणि सद्यःस्थिती. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2025; 4(7):12-16,