Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.
Mail: allstudy.paper@gmail.com
Contact: +91-9650866419
Impact factor (QJIF): 8.4 E-ISSN: 2583-6528
INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION
VOL.: 4 ISSUE.: 2(February 2025)
Author(s): प्रा. डॉ. प्रवीण घारपुरे
Abstract:
भावकाव्य म्हणजे भावनांच्या तीव्रतेने आणि रसपूर्ण अभिव्यक्तीने नटलेले काव्य. या काव्यप्रकारात कवीच्या हृदयातील भावना सौंदर्यपूर्ण शैलीत मांडल्या जातात. भावकविता मुख्यतः श्रृंगारिक, भक्तिरसात्मक, देशप्रेमपर, करुणरसप्रधान आणि वात्सल्यप्रधान अशा विविध स्वरूपांत आढळते. भावकवितेच्या माध्यमातून वाचकाच्या अंतःकरणात सौंदर्यदृष्टी निर्माण करणे, मानवी भावनांचे उत्कट प्रकटीकरण करणे, सामाजिक व आध्यात्मिक जाणिवा विकसित करणे, साहित्य आणि जीवन यामधील संवेदनशील नाते दृढ करणे हाच उद्देश प्रतीत होतो. कवी आपल्या वैयक्तिक भावनांचे प्रकटीकरण करीत असताना सामाजिक परिस्थितीवरील चिंतनही मांडत असतो. मानवी नातेसंबंधांचे सौंदर्य उलगडून संवेदनशीलतेला जागृत करीत असतो. त्यासाठी विविध प्रतिमांमध्ये निसर्गचित्रे, मानवी हावभाव, अध्यात्मिक अनुभव, सौंदर्यदर्शन निर्मिती आपल्या भावकाव्यात निर्माण करीत असतो. आपल्या अनुभूतींना भावकाव्यातून हळुवार, लयबद्ध, सहज, प्रतीकात्मक पद्धतीने अभिव्यक्त करीत असतो. भावकाव्य लेखन करणाऱ्या प्रमुख कवींमध्ये कुसुमाग्रजाची सामाजिक भान असलेल्या भावकविता, केशवसुत यांची स्वातंत्र्य आणि नवचैतन्याने भारलेल्या कविता, वि. स. खांडेकर यांची करुणरसप्रधान आणि राष्ट्रप्रेमपर कविता, बा. भ. बोरकर यांची सौंदर्यदृष्टी आणि निसर्गप्रतिमा यांचा सुरेख संगम असलेली कविता, मंगेश पाडगांवकरांची प्रेम, वात्सल्य आणि जीवननिष्ठेने भारलेल्या कविता, शांता शेळके यांची कोमल भावना, आईचे प्रेम आणि निसर्गचित्रण करणारी कविता आणि इंदिरा संतांची वात्सल्यप्रधान आणि साध्या, सोप्या शैलीतील कविता मराठी साहित्यात विशेषत्वाने प्रत्ययास येते. यासारख्या अनेक कवींचे मराठी भावकवितेतील योगदान नाविन्यपूर्ण आहे.
keywords:
Pages: 46-48 | 2 View | 0 Download
How to Cite this Article:
प्रा. डॉ. प्रवीण घारपुरे. मराठी भावकविता: अंतरंग आणि स्वरूप. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2025; 4(2):46-48,